सातारा ऑरगॅनिक उपक्रमाचा प्रारंभ
दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी सातारा जिल्हा परिषदेचा सातारा ऑनगॅनिक या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ मा.ना.श्री विजयराव शिवथरे,पालकमंत्री जिल्हा सातारा यांचे हस्ते व मा. श्री. नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा यांचे उपस्थितीत करणेत आला. अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी अधिक उत्पादन देणा-या व संकरीत जाती,रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके यांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येत आहे.त्याच्या वापरामुळे पीक उत्पादनात निश्चितच वाढ झाली,परंतू रासायनिक खते व कीटकनाशकांच्या सततच्या व अयोग्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे, पिकांची उत्पादकता कमी होणे व उत्पादित शेतमालाची प्रत खालावणे,मानव व पशूपक्षी यांच्या आरोग्यावर परिणाम होणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत.त्याच प्रमाणे पाण्याचे आणि वातावरणाचे प्रदूषणही मोठया प्रमाणावर होत आहे.हे लक्षात घेता,सेंद्रीय शेती ही केवळ शेती पध्दती न राहता जीनवशैली व्हावी यासाठी जिल्हयात सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन व सेंद्रीय शेतमाल विक्रीस सहायता करणेचा अभिनव उपक्रम सातारा ऑरगॅनिक या नावाने शेतक-यांच्या सहभागातून राबविण्यात येत आहे.
सातारा जिल्हयातील सेंद्रीय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी नोंदणी केलेल्या उत्पादक शेतक-यांकडील शेतमालाची विक्री जिल्हयातील महीला बचत गटांचे मार्फत करण्याचा मानस असुन सदर विक्री केंद्रासाठी पंचायत समिती सातारा येथिल डी.आर.डी.ए.कडील उभारण्यात आलेल्या दुकान गाळयामध्ये सेंद्रीय उत्पादक शेतक-यांचा शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून त्याची विक्री महीला बचत गटामार्फत करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत केलेला भाजीपाला,आले,हळद,काकडी,मुळा,कोथिंबीर,पेरू,सिताफळ,सेंद्रीय गुळ,काकवी,चवळी,गहू,ज्वारी,मोहरी,हरभरा डाळ,कांदा,घेवडा डाळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच सेंद्रीय पध्दतीने तयार केलेले आवळा ज्यूस,फेस पॅक,शाम्पू,साबण देखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
सातारा ऑरगॅनिक उपक्रमांतर्गत सातारा पंचायत समितीचे आवारात सुरू करण्यात आलेले सदरचे सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र आठवडयातून गुरूवार व रविवार या दोन दिवशी सुरू राहणार असून जिल्हयातील इतर ठीकाणी देखील अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्याचे नियोजित आहे.शेतक-यांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमास मा.ना.पालकमंत्री महोदय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.या उपक्रमाची माहीती सातारा जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ. www.satarazp.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उपक्रमा अंतर्गत सहभागी शेतक-यांचे शेतावर क्षेत्रीय भेट देणे,शेतक-यांना प्रशिक्षण देणे,सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी मदत करणे तसेच कृषि विद्यापीठामध्ये शेतक-यांचे सहलीचे आयोजन करणे इत्यादी उप्रकम देखील राबविण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री सोनवलकर, उपाध्यक्ष मा.श्री रवि साळुंखे, समाजकल्याण सभापती मा.श्री. माळवे, कृषि,पशूसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती मा.श्री शिवाजीराव शिंदे, सातारा पंचायत समितीच्या सभापती श्रीमती कविता चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री पी.बी.पाटील, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा मा.श्री थाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.श्री जितेंद्र शिंदे, प्रकल्प संचालक (आत्मा) मा.श्री गणेश घोरपडे, कृषि विकास अधिकारी मा.श्री चांगदेव बागल तसेच जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व सातारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com