सोमवार, ५ मार्च, २०१८

३० वर्षापूर्वी, दिल्लीस्थित हे उच्च विद्याविभूषित दाम्पत्य, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून जंगलात ओर्गनिक शेती करू लागले, एक अद्भुत याशावी साहसकथा.


सारांश

आर्थिक स्थैर्याचे जीवन सोडून देवून, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शेतीची माहिती नसतानाही शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे, ४० एकर ओसाड डोंगराळ जागेत आज भाज्या, कापूस, ई. ओर्गनिक पद्धतीने पिकवून विवेक आणि जुली करिअप्पा यांनी आपल्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. निसर्गाचा र्हास रोखण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करत



सविस्तर बातमी

३० वर्षापूर्वी, दिल्लीस्थित हे उच्च विद्याविभूषित दाम्पत्य, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून जंगलात ओर्गनिक शेती करू लागले, एक अद्भुत याशावी साहसकथा.
तुम्ही उच्चविद्याविभूषित आहात, तुम्हाला आणि तुमच्या बायकोला दिल्लीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे, पदरी दोन गुणी मुलं आहेत, सगळ काही छान सुरु आहे....
एक दिवस जेवणाच्या टेबलावर तुम्हां कुटुंबियांमध्ये रासायनिक खते आणि पेस्टीसाईडस फवारलेल्या अन्नाविषयी चर्चा होते, हे असलं विष माणसाने का खायचं म्हणून तुम्ही आता ऑरगॅनिक फूड खायला लागता.
यातूनच समाजाचं देणे आपण दिलं पाहिजे म्हणून ते सुखासीन आयुष्य सोडता आणि कुटुंबियांसकट कष्टप्रद नैसर्गिक शेतीचं तुम्ही पूर्णपणे अनभीज्ञ असलेळे क्षेत्र एक आव्हानी करिअर म्हणून निवडता......
संपूर्ण कुटुंबियांच्या साथीने एक यशस्वी ऑरगॅनिक स्वयंपूर्ण शेतकरी म्हणून निव्वळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सुद्धा भारताचे नाव उज्वल करता.
सगळंच अदभूत...शब्दशः स्वप्नवत
फार्मर्स बाय चॉइस विवेकजुली करिअप्पा कुटुंबीय मंडळी
असं म्हणतात, की आपल्या आजूबाजूला बदल घडवून आणायचा असेल, तर तो आधी स्वतः मध्ये घडवून आणावा लागतो!
विवेक आणि जुली करिअप्पा या दाम्पत्याबद्दल बोलताना ही गोष्ट अत्यंत समर्पक वाटते.
३४ वर्षांपूर्वी, दिल्लीमध्ये उच्च शिक्षण घेवून अत्यंत चांगल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत असलेले विवेक आणि जुली, निसर्गाच्या होणार्या र्हासामुळे अस्वस्थ होते.
आपल्या पुढच्या पिढीला आपण काय नैसर्गिक ठेवा ठेवू शकणार, याबद्दल चिंतीत होते. फक्त तुम्हां आम्हांसारखं फक्त चिंता करून ते शांत बसले नाहीत तर त्यांनी स्वतःच याबाबत काहीतरी प्रयत्न करायच ठरवलं आणि ते शेती किंवा लागवडीसाठी योग्य जागा शोधू लागले.
त्यांना मिळाली ती अत्यंत सुंदर पण नापीक आणि दगडांनी– काट्यांकुट्यानी भरलेली, मागे एक डोंगर असलेली, ४० एकर जमीन... आणि ती देखील शहरीकरणाचा मागमूस नसलेल्या कर्नाटक मधील हेग्ग्द्देवन्ना-कोटे या गावात. अगदी जवळ रेल्वेलाईन सुधा नाही, फक्त छोटीशी नदी वाहते, अगदी इतकी निसर्गाच्या जवळ.
विवेक आणि जुली यांनी सुरुवात केली ती त्या उजाड जमिनीवर एक छोटसं दगडी घर बांधून. पण, त्यांची हौस ‘फार्म- हाउस’ पुरती मर्यादित नव्हती, तर ते एक मोठ स्वप्न पहात होते ज्याची सुरुवात घराच्या आजूबाजूला हळू हळू झाडे लावायला सुरुवात करून झाली.
मोठा मुलगा कबीर सोबत शेतात काम करताना आई जुली करिअप्पा
शेतीचा, किंवा बागायातीचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना, हे स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी त्यांना अक्षरशः भगीरथ प्रयत्न करावे लागले. परंतु, आपल्याला काय करायचे आहे हे मनाशी ठाम असल्यावर, कष्टांच्या जोडीने अत्यंत अवघड असं त्याचं स्वप्नं या दोघांनी गेल्या तीन दशकांच्या अथक अभ्यासाने, मेहेनतीने सत्यात उतरवून दाखवलं आहे.
 
सुरुवातीला केवळ १४ एकर जमिनीमध्ये त्यांनी विविध पिकं घेण्यास सुरुवात केली. जमिनीच्या पोताप्रमाणे, निसर्गचक्राचा सखोल अभ्यास करून, त्यांनी त्यात हळूहळू बदल केले.
सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांनी सुरुवाती पासूनच रासायनिक खतांचा वापर करायचा नाही हे ठरवले होते, त्यानुसार नैसर्गिक खतांचा अभ्यास करून, त्यांचा वापर सुरु केला.
विवेकजी सांगतात, पंचगव्याचा वापर केल्यावर आमच्या शेतावर येणाऱ्या प्रत्येकाला इथे काहीतरी बदल झालाय याची जाणीव व्हायची. इथल्या हिरवेपणामध्ये देखील एक वैशिष्ट्य आलं, पिकांच्या चवीमध्येही फरक कळून येऊ लागला आणि एकूणच उत्पादनामध्ये वाढ झाली.
करिअप्पा कुटुंबीयांनी स्वयंपूर्ण शेतीसाठी फार्मवर जोपासलेले गोधन
विसाव्या शतकात ‘ओर्गनिक फूड’ ची संकल्पना भारतात रुजत होती तेंव्हा विवेक आणि जुली करिअप्पा यांचे प्रयोग आणि प्रयत्न यांचं स्वागत आणि कौतुक दोन्ही झालं!!
विवेक आणि जुली यांच्या ४० एकर शेतात आज जवळजवळ ३५ प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात आणि त्यातला मोठ हिस्सा कुर्गच्या नामांकित रीसोर्टना पुरवला जातो.
गाईचे शेणखत वापरून केलेल्या शेतीमाला सोबत विवेक करिअप्पा
करीअप्पा कुटुंबीयांनी जाणीव पूर्वक आपल्या शेतातील सर्व उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे ठरवले आहे पण ते प्रोसेस करून! फळांचा जाम, धान्यांची पीठे, ऑरगॅनिक गूळ पावडर, त्यांच्याच शेतातील कापसापासून बनवलेली खादीची वस्त्रोत्पादने या स्वरूपात.
त्यांच्याकडे तयार होणारे कापड लंडनस्थित ‘Just Clean Cotton’ या संकेतस्थळावर विक्रीला उपलब्ध आहे. हे वाटते तितके सोप्पे नाही.
ऑरगॅनिक शेती करून तयार केलेल्या धाग्या सोबत जुली करिअप्पा
पण त्यांच्या याच धोरणामुळे, हलसणूर तालुक्यातील किमान ५० कुटुंबे आर्थिकरित्या स्वावलंबी झाली. आज शहरातील नामांकित डीजायनर त्यांच्या कडील तयार कापडाचे विविध डीझाइनचे कपडे त्यांच्याच ब्रांडने बाजारात उपलब्ध करून देतात.
Just Clean Cotton ...करिअप्पा यांचा स्वतःचा ब्रांड
आज करिअप्पा यांचे एच.डी. कोट्टे येथील ‘क्रक -ए-दाव्ना’ (Krac-a-dawna) हे फार्म, आज अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. हे अनोखे नाव देखील त्यांच्या मुलाच्या फ्रेंच भाषा प्रेमातून जन्माला आले आहे.
विवेक आणि जुली करिअप्पा यांना त्यांच्या या कार्याबद्दल शासनाच्या ‘कृषी पंडित’ या सन्माननीय पुरस्काराने देखील गौरवले गेलं आहे.
पण, केवळ आपली शेती, त्यातून येणारे उत्पन्न आणि आपली कौटुंबिक प्रगती यापुरतेच विवेक आणि जुली करिअप्पा यांचे विश्व मर्यादित राहिले नाही. त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण भागात शेती करण सोपं नाही, त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध नाही. तसंच, ग्रामीण शैक्षणिक धोरणांचा भर मुलांनी शिकून शहराकडे जावे आणि तिथे नोकरी –उद्योग शोधावा असाच असतो.
करिअप्पा कुटुंबातली महिला फळी शेतात काम करताना
त्यांनी आपल्या कबीर आणि आझाद या दोन्ही मुलांना जाणीवपूर्वक नैसर्गिक शेतीच्या वातावरणातच वाढविले, इतकंच नव्हे तर जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर आपल्या शेतीमध्ये करता येईल याबाबत प्रशिक्षण घेण्यास त्यांनी या दोघांनाही उद्युक्त केलं.
आज, कबीर आणि आझाद दोघेही आपल्या आई-वडिलांनी सुरु केलेला हा प्रयत्न पुढे सुरु ठेवण्यात सहभागी झाले आहेत, इतकंच नव्हे तर कबीरची पत्नी अंजली हिला देखील शेतीची खूप आवड आहे.
जुली यांच्या मते, ओर्गनिक फूडचं प्रेम केवळ ते खरेदी करण्यापुरते न ठेवता, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी उद्युक्त करणे आणि आपले आपण देखील काही पिकवणे याकडे झुकले पाहिजे.
त्या म्हणतात, “Organic is not a product, it’s a process of self –awareness.”
‘क्रक-ए-दाव्ना’ ची प्रगती पाहून, अनेक शेतकऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन आणि शेती विषयक सल्ला देण्याची विनंती केली.
स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना करिअप्पा दांपत्य
यातूनच जन्म झाला सवैयव कृशीकारा संघाचा! [Savaiyava Krishikara Sagha (SKS)] आज १५० हून अधिक सभासद असलेल्या या संस्थेतर्फे इच्छुक शेतकऱ्यांना नैसर्गिक जैविक शेती बद्दल माहिती आणि मार्गदर्शन केले जाते.
प्रसंगी दगडाचे सूप पिवून देखील दिवस काढलेल्या पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अथक कष्ट घेवून काही प्रमाणाततरी निसर्गाचे रक्षण करण्यात यशस्वी ठरलेल्या विवेक- जुली करिअप्पा यांच्या व्यक्तिमत्वातच प्रेरणा ठासून भरलेली आहे.
करिअप्पा कुटुंबियांचा आदर्श आपण भारतीयांनी ठेवायलाच हवा....
अशा या प्रेरणादायी करिअप्पा कुटुंबाविषयी आणि ‘क्रक ए दाव्ना’ बद्दल टीम भारतीयन्स’ला विलक्षण आदर वाटतो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...