शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

संपूर्ण जगात आता सेंद्रिय पध्तीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला औषधी वन्सपती, सेंद्रिय दूध आदि खादय पदार्थांना चांगली मागणी आहे. कारण रासायनिक खते, किटक नाशके व अन्य औषधे यांचा अति वापर केल्याने निर्माण झालेला शेतमाल, दुध इत्यादी यामध्येही रसायनांचा शिरकारव होतो व तो शेतमाल, फळे दिसण्यास आकर्षक असला तरी प्रकृतीस हानीकारक ठरतो हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे. तसेच या रसायनांचा वापर शेतजमीन, पाणी, हवा परिसर यांनाही खराब करतो. प्रदूषणांच्या या दोषांमुळे रसायनाचा वापर नसलेलाच शेतमाल व दुध वापरावे असा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांनीसुध्दा यात लक्ष घातले आहे.
भारत सरकारनेही याविषयी शेतकरी, व्यापारी यांना साहयकारी ठरेल अशा उपाययोजना सुरु केल्या आहेत. कारण भारताला या क्षेत्रात मोठा वाव आहे मात्र युरोप, अमेरिका आदि प्रगत देशांतून प्रचंड मागणी असली तरी तेथील तपासणी ही कडक आहे. सेंद्रिय पदार्थांचे परिक्षण करणे व त्यांना तसे प्रमाणपत्र मिळवून देणे, त्यांचे वर्गीकरण, निरीक्षण करणे याची काही कार्यपध्दती व मागणी
निश्चित केली आहेत.
येथे "सेंद्रिय" म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतात मोठया प्रमाणात शेती परंपरागत पध्दतीने केली जाते. पण परंपरागत सेंद्रिय नव्हे. संपूर्ण सेंद्रिय शेतमाल असण्यासाठी प्रारंभापासून लक्ष घालणे व संबंधित शेती विभाग, कृषी विदयापीठे संस्था यांचे निरिक्षण व मदत घेणे प्रमाणपत्रासाठी आवश्यक असते.
वरती ज्यांचा उल्लेख केला आहे त्या युनोच्या जागतिक आरोग्य संघटना व जागतिक अन्न व शेती संघटना यांचे "कोडेकस ॲलीमेंअरीयस कमीशन" या संस्थेने सेंद्रिय शेतीची व्याख्या केली आहे ती अशा :- सेंद्रिय शेती म्हणजे अशी उत्पादन पध्दती जी कृत्रिमरित्या  वेगवेगळया पदार्थांचे मिश्रण करुन केलेली खते, किटकनाशके, वाढीचे नियमन करणाऱ्या औषधांचा तसेच जनावरांच्या खादयात औषधांचा  वापर करत नाही अशा शेतीची पध्दत. सेंद्रिय शेतीमध्ये पिके आळीपाळीने घेणे, पिकांचे अवशेष, शेण खते, हिरवी खते, द्विदल धान्ये, शेती बाहय पण सेंद्रिय कचरा यांचा वापर केला जातो. जमीनीची उत्पादकता टिकविली जाते, खोल नांगरणी केली जाते पोषणासोबत किटक व अळी नियंत्रणासाठी सजीव किटक नियंत्रण पध्दतींचाच वापर केला जातो.
सेंद्रिय शेतीचा प्रारंभ तळापासून होतो. मातीची व जमीनीचा उपयोग पर्यावरण रक्षणाच्या व सामजिक जबाबदारीच्या जाणिवेने केला जातो. त्यांची पुनरुत्पादनक्षमता सेंद्रिय पध्दतीनेच वाढविता येते. त्यासाठी मातीचे व्यवस्थापन केले जाते. रोपांचे योग्य पोषण केले जाते व त्यातून रोग प्रतिकारक शक्ती असलेली शेती उत्पादने तयार होतात.
भारतात सेंद्रिय शेतीला खूप वाव आहे. येथील वेगवेगळया प्रकारच्या हवामानामुळे सर्व प्रकारची सेंद्रिय उत्पादने घेता येणे शक्य आहे. तसेच पूर्वापार शेतीची पध्दत सेंद्रियच राहिली आहे. त्यामुळे घरगुती व निर्यात बाजारपेठेतून मोठया प्रमाणात फायदा घेता येईल. जगात सेंद्रिय  शेती करणाऱ्या मोठया देशांच्या क्रमवारीत भारत दहाव्या स्थानावर आहे. एकूण शेतजमिनीपैकी 10 टक्के जमिनी सेंद्रिय शेतीसाठी उपलब्ध आहे. 0.50 दशलक्ष हेक्टर जमीन लागवड योग्य आहे. उर्वरित 90 टक्के (4.71 दशलक्ष हेक्टर) जमिनीवर वने आहेत. त्यातून किरकोळ वन उत्पादने मिळू शकतात. वर्ष 2012-13 मध्ये एकूण 5.21 दशलक्ष हेक्टर जमिनीचा सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणिकरण  करण्यात आले होते. भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादने म्हणजे ऊस, कापूस, बासमती तांदूळ, मसाले, डाळी, चहा, कॉफी, तेलबिया फळे व त्यांचे मूल्यवर्धित  उत्पादने ही आहेत. एकूण 1.34 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन होते. सर्वात जास्त सेंद्रिय शेती उत्पादने मध्यप्रदेश या राज्यात होतात. त्यानंतर राजस्थान व उत्तर प्रदेश यांचा नंबर लागतो.
दुभत्‍या पशुंची सेंद्रिय पध्दतीने निगा
सेंद्रिय पध्दतीने पशूपालन केलेल्या दुभत्या  जनावरांच्या म्हणजे गायी, म्हशी, बकऱ्या आदिंचे दुध व त्याचे पदार्थ यांनाही मागणी आहे. यासाठीही काही मानके ठरवून दिली आहे व तसे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांना अधिस्वीकृती देण्यात आली आहेत. त्यांचे प्रमाणपत्र या दुधाच्या व्यापारास आवश्यक असते. सेंद्रिय  दुधाची व्याख्याही करण्यात आली आहे ती अशी "ज्या सस्तन पशूंच्या आहारात कोणत्याही कृत्रिम खतांच्या साहयाने तयार केलेले खादय नसते, त्यांच्या दुधास "सेंद्रिय दुध" म्हटले जाते. म्हणून या पशूंची वाढ व संवर्धन करतांना त्यांचे खादय फक्त सेंद्रिय पध्दतीने तयार केले आहे की नाही याकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच त्यांना नैसर्गिक वातावरणातच ठेवावे लागते. त्यांना अँटीबायोटिक्स, रासायनिक औषधे दिली जात नाहीत. त्यांना आजार झाल्यास  त्याचे नियंत्रण आहारातूनच केले जाते. रोग होऊच नये याची काळजी घेतली जाते. त्यांना चरायला नेणे, समतोल आहार देणे, निरोगी जागेत ठेवणे व कुठलाही ताण पडणार नाही याकडे लक्ष दिले जाते. त्यांचा जन्म व संगोपनही सेंद्रिय शेतीमध्ये झालेले असावा. तसे ज्या प्रजाती स्थानिक वातावरणाशी अनुरुप असतील त्याच फक्त वाढविल्या जातात. जन्म नैसर्गिक असावा, गर्भाशय बदलाचे तंत्र वापरण्यास परवानगी नसते, हार्मोनल हिट ट्रिटमेंट, कृत्रिम गर्भधारणा, जीएमओ तंत्रज्ञान यांना बंदी असते. त्यांचे खादय 100 टक्के सेंद्रिय असावे लागते.  ॲलेपॅथिक औषधे, रॉनिक्स, भूख वाढविणारी औषधे, प्रतिजैविके देण्यास मनाई असते. तसेच या दुभत्या पशूंना पिंजऱ्यात कोंडून ठेवता येत नाही. अशा अनेक अटी आहेत.
सेंद्रिय दुधाचे महत्त्व
सेंद्रिय दुधात व्हिटॅमीन ए व इ ही जीवनसत्वे जास्‍त असतात. मानवी शरीरात होणाऱ्या आजारात हे दुध प्रभावी ठरते. त्यात फॅटी ॲसीडस असतात. हृदय विकास, संधिवात आदि आजारांना दूर ठेवण्याकरिता सेंद्रिय दुध उपयुक्त ठरते.
सेंद्रिय नसलेल्या दुधात अनेक केमिकल्स असू शकतात. त्यामुळे ते दुध पिणाऱ्यांना काही आजार होऊ शकात. सेंद्रिय दूधाचे उत्पादन हे स्वस्त असते.
सेंद्रिय उत्पानांचे प्रमाणिकरण केवळ आहारात नव्हे तर सौंदर्य प्रसाधने, आरोग्य, फॅशन कपडे क्षेत्रातही सेंद्रिय उत्पादनांना मागणी आहे. युरोप-अमेरिकेत यासाठी मुद्दाम प्रचार केला जातो. यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य व उदयोग मंत्रालयाने "नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑगॅनिक प्रोडक्टस" 2000 मध्ये सुरु केला.  परदेशी व्यापार व विकास कायदयांतर्गत त्याची अधिसूचना काढण्यात आली. सेंद्रिय मालाचे प्रमाणिकीकरण  करण्यासाठी मानके, निकष तयार करणे त्याची कार्यपध्दती ठरविणे, प्रमाणपत्रे देणाऱ्या संस्थांना मान्यता देणे व प्रमाणपत्र मिळालेल्या पदार्थांच्या  वेष्टनावर "राष्ट्रीय सेंद्रिय मानचिन्ह" वापरण्यास परवानगी देणे आदिंचा समावेश या कार्यक्रमात आहे. यासाठी वाणिज्य मंत्रालय ही शिखर संस्था आहे. ही कार्य पध्दती आंतरराष्ट्रीय दर्जाशी सुसंगत असल्याबद्दल युरोपीय राष्ट्रांनी 2006 मध्ये मान्यता दिली आहे.
वाणिज्य मंत्रालयातर्गत एपीईडीए अर्थात "कृषि प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण" ही संस्था कार्यरत आहे. त्यांनी अकरा संस्थांना प्रमाणपत्रे देण्याचे अधिकार प्रदान केले. प्रमाणित उत्पादनांना "लोगो" लावल्यास परवानगी मिळते. त्यामुळे ही उत्पादने सहज ओळखता येतात. त्याची किंमत चांगली मिळते.  यामुळे छोटया  शेतकऱ्यालाही निर्यात करता येते.
नेटवर पुस्तिका उपलबध :-  केंद्र सरकारच्या कृषि मंत्रालयाने माहिती देणारी एक पुस्तिका  प्रकाशित केली आहे. "सर्टिफिकेशन अँड इन्स्पेक्शन ऑफ ऑर्गनिक फार्मिंग" असे या पुस्तिकेचे नाव असून ती डॉ. ए. के. यादव या शास्त्रज्ञांनी लिहिली आहे. ही पुस्तिका कृषि व सहकार विभागाची वेबसाईट www.dacnet.nic.in/nocf येथे उपलब्ध आहे. जमीन लागवड वापर अहवाल ठेवणे, जागेची तपासणी, सर्व बाबींचा सखोल अभ्यास, कागदपत्रे, योजना, अनूयापालन, निरिक्षण, कसे करावे आदि माहिती यामध्ये दिलेली आहे. ऑर्गनिक उत्पादने "नॅशनल सेंटर ऑफ ऑगँनिक फार्मिंग, सी-90-11- कमला नेहरु नगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश  201002 या पत्यावर संपर्क साधावा.
सेंद्रिय शेती संबंधात युरोपियन देशात तसेच जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व चीन येथे कायदे केले आहेत. तेथील सेंद्रिय उत्पादनांवर तसेच "चिन्ह" त्यामुळे लावता येते. भारतात सुध्दा आता तसे चिन्ह दिले आहे. ते या वेबसाईटवर दिले आहे. त्याचा वापर उत्पादकांना करता येईल त्यामुळे बाजारात, मॉल येथे ही उत्पादने ग्राहकांना पटकन ओळखता येतील.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ॲसोचेम) या संस्थेच्या वेबसाईटवर सुध्दा याबद्दल माहिती आहे.
अलिकडेच "इंडियन काँपीटन्स सेंटर फॉर ऑगॅनिक ॲग्रीकल्चर (आयसीसीओए) हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ते सेंद्रिय शेतीचा प्रसार करणे, माहिती देणे, कागदपत्रे तयार करणे इ. कामे करील.
महाराष्ट्र राज्यात "महाराष्ट्र ऑर्गनिक फर्मिंग फेडरेशन (एमओएफएफ) ही संस्था प्रमाणपत्रे देणे व इतर कामे करते.
      भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनांचा दर्जा व मानके आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या देशातील मानकांच्या समकक्ष असल्याची मान्यता युरोप व स्वितर्झंलड यांनी दिली आहे.
      भारतातील काही मंत्रालयाच्या सहकार्याने आणखी काही संस्था सेंद्रिय उत्पादनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कृषि मंत्रालयातर्गत "राष्ट्रीय जैविक खेती परियोजना किवा नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गनिक फार्मिंग ही संस्था देशभरात अनेक उपक्रम करते. या संस्थेची देशात सहा प्रादेशिक कार्यालये असून त्यातील एक महाराष्ट्रात नागपूर येथे आहे. अन्य कार्यालये, बंगलोर, भुवनेश्वर, हिस्सार, इम्फाळ व जबलपूर येथे आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरे, प्रकाशने इ. उपक्रम हाती घेतले जातात.
महाराष्ट्र ऑर्गनिक फार्मिग फेडरेशन (एमओएफएफ)
      महाराष्ट्रातील या संस्थेचे काम मोठया प्रमाणात चालू आहे. या संस्थेने महाराष्ट्रात मोठया प्रमाणावरील म्हणजे कापूस, तांदूळ, लाल चणे, ऊस व गहू यांचे सेंद्रिय उत्पादन कसे घ्यावे याविषयी एक पुस्तक प्रकाशित केली आहे. www.moffindia.com या संस्थेची वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच संस्था प्रशिक्षण शिबिरे घेते. महिला शेतकऱ्यांसाठी  वेगळी शिबिरे, परिक्षा, प्रकल्प शेतीच्या भेटी-सहली आदि उपक्रम चालतात. आता या सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून "फॉमर्स प्रोडयूसर्स कंपनी" सुध्दा काढली आहे. संस्थेचे सेंद्रिय बियाणे मिळविणे, लागवड, पोषण, सेंद्रिय खते व किटकनाशके असे सर्वंकष प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले जाते. संस्थेचा पत्ता 103 ए/11 बालाजी निवास, प्लॅट नं. 5, कॉस्मॉस बँक लेन, दिप बंगला चौक, मॉडेल कॉलनी, पुणे  411016 आहे. (फोन 91-2025659090)
      राज्यातील 1,42,000 शेतकरी व अन्य संबंधित व्यक्ती या संस्थेच्या सदस्य आहेत. "शाश्वत" नावाचे मासिकही काढले जाते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...