रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

सेंद्रिय शेतीचे आहेत याचा अवलंब केल्याने रासायनिक खते किटकनाशके व तणनाशके इत्‍यादिंचा वापर कमी करून अन्‍नधान्‍याचा दर्जा वाढविण्यास मदत होते. याबरोबरच उत्पादन खर्चही कमी होतो. महाराष्ट्रात काही प्रगतशील शेतकरी सेंद्रीय शेतीचा अवलंब करू लागले आहेत. राज्‍यात सेंद्रीय शेतीला उत्‍तेजन देणा-या दोन योजना राबविण्‍यात येत आहेत. त्‍यापैकी पहिली योजना 150 % राज्‍यपुरस्‍कृत असुन ती वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन अभियानातंर्गत राबविली जात आहे. सेंद्रिय शेती केल्याने काय फायदे होतात? हे जाणून घेऊया.;

नत्र पुरवठा :

  • जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.
  • शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते :

  • ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.
  • [एक एकरात ८ टन शेणखत (कुजलेले) घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.]
  • जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो.जमिनीची धुप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहिसे होत जातात.वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व पाणी धरुन ठेवण्याची क्षमताही वाढते.

स्फुरद व पालाश :

  • सेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांच्याद्वारे शोषली जातात.

जमिनीचा सामू :

  • सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.

कँशन एक्स्चेंज कॅपॅसिटी (CEC) :

  • कँशन एक्सचेंज कँपोसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती.
  • सेंद्रिय खतांमुळे कँशन अँक्शचेंज कँपोसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलीत पोषकद्रव्ये मिळतात.

कर्बाचा पुरवठा :

  • कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.

सेंद्रिय खतांचा परिणाम :

  • सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात.उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमिन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.
  • सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.त्यात रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात .अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
  • अब आपको मिलेगी :
    कॅश ऑन डिलिव्हरी Amazone पर ईस No:-8956871244 को सर्च करके

    आपका दोस्त:-9767981244

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...