बुधवार, ३ जानेवारी, २०१८

                                                             
                                           
                                                           तण आणि तण नाशके 
              तण :-     शेत तण विरहित ,स्वच्छ ठेवणारा शेतकरी चांगला समजला जातो.
'तण खाई धन' हि म्हण सुद्धा आहे. मात्र बदलत्या काळात आपल्याला दुसरी म्हण शिकावी लागेल.
'तन देई धन'. आपल्या जमिनीला सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा सतत व्हायला पाहिजे.  तो तनांतून मोठ्या प्रमानावर   होऊ शकतो .
                                 आपण तणाचा अभ्यास करायला पाहिजे.  द्विदल प्रकारातील तणे नत्र व
पालापाचोळा पुरवतात. केन जमिनीला समांतर पसरवतो ,
मागून येणाऱ्या तनाना तो झाकून टाकतो.  ज्वारीमध्ये बरबडा (दिवाळी) फायद्याचा ठरतो भरपूर
नत्रपुरवठा त्यातून होतो; पालापाचोळाहि पडतो.  ज्वारीची कापणी करताना सोबत आलेल्या बरबड्याची
झाडे गुरांसाठी पोषकच असतात. दुष्काळात लोईक बरबड्याच्या बियांवर जगल्याची उदाहरणे आहेत .
त्यांची झाडे उपटून निरीक्षण करावे. नत्रपुरवठा करणाऱ्या गाठीचे अवलोकन करा आणि मग ठरवा
काय करायचे ते.
                                 सेंद्रिय शेतीने जमिन मऊ होत असते.  काडी कचरा शेतात मुरायला लागलाकी
जमिनीचा पोत पूर्णच बदलतो.
                                  कुंदा असलेल्या जागी भर पावसाळ्यात जमीन नांगरवी; फायदा होतो असा
शेतकर्यांचा अनुभव आहे.
        तणनाशके:-   मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक आहेत.  पुढील पिढ्यानाही याचे परिणाम
 भोगावे लागतील. जमिनीतील उपयोगी जीवजंतूवरही ह्याचा वाईट परिणाम होत असणार. अशा जहाल  रसायनांचा आपण वापर का करायचा ?
                             रसायने  वापरून तण संपविणे हे सर्वथा चुकीचे आहे.  तणे भूमातेची वस्त्रे आहेत;
निसर्गाने माती झाकायला केलेली ती व्यवस्था आहे.  आपण तणनाशके वापरून तिचे वस्त्रहरण करीत
आहोत याचे भान वापरणारलाच नाही.
                              नाशिक परिसरातील उदाहरण बोलके आहे.  काही वर्षपूर्वीची गोष्ट आहे.
तणनाशके फवारलेल्या द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य रोग भरपूर, तर न फवारलेल्या तणकट असलेल्या बागांमध्ये तो रोग नाही अशी स्थिती होती .
                              यावरून निष्कर्ष असाच निघतो कि तणांचे उच्चाटन करण्याची भाषा माणसाने
बोलू नये;  त्यांचेसोबत शेती करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...