शुक्रवार, ३० मार्च, २०१८

सेंद्रिय शेतीचे फायदे या मागील लेखात आपण सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे जाणून घेतले. या सदरात आपण सेंद्रिय शेती करण्यापूर्वीचे निकष, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, विविध योजना, सेंद्रिय शेती कार्यक्रम पद्धती याबरोबरच सेंद्रिय शेती प्रक्रियेतील आवश्यक गोष्टी इ .सर्व गोष्टीची माहिती जाणून घेऊया. त्यामध्ये मुख्यत सेंद्रिय शेती करण्याची गरज आपण मागील सदरात बघितले आता ह्या सदरात सेंद्रिय शेतीसाठीची मानके काय असतील? ते बघूया.

उपलब्ध नैसर्गिक साधने आणि तंत्राचा अवलंब :
शक्यतो गावरान बियाण्याचा वापर करावा कारण ते रोग व कीड प्रतिकारक असते तसेच ते कोणत्याही वातावरणात उत्तम वाढते. जर आपल्याकडे असे बियाणे उपलब्ध नसेल तर आपण आपल्या शेतीत पूर्वी तयार केलेले बियाणे वापरावे.

पिकाची फेरपालट करून जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण वाढून कीड व रोगाचे नियत्रण होते .

शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतीत उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ, हिरवळीची खते , गांडूळ खते , कंपोस्ट खत , खोल मुळे असणाऱ्या वनस्पती तसेच द्विदल पिकाची लागवड करणे जरुरी आहे.

पिक लागवडीच्या आधी नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा. उदा. गोमुत्र, राख, जीवाणू खत ई .

पिक संरक्षणासाठी निंबोळी अर्क, सापळा पिके, मित्र पिके, लसुन मिरची ताक मिश्रण, परोपकारी जीवजंतू व कीटकांचा वापर करावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...