Agro:
आच्छादन
शेती करतांना तिची सुपीकता वाढण्या साठी काही गोष्टींची खूप आवश्यकता असते आच्छादन त्यातीलच एक महत्वपूर्ण भाग आहे. ज्या विषयी आज आपण माहिती घेऊ.
माणूस जसा थंडी, ऊन, वाऱ्यापासून, शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो, तशीच गरज जमिनीला सुद्धा असते हे आता सिद्ध झाले आहे.
माणूस जसा थंडी, ऊन, वाऱ्यापासून, शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो, तशीच गरज जमिनीला सुद्धा असते हे आता सिद्ध झाले आहे.
गांडूळे, मुंग्या, मुंगळे इ. नजरेला दिसणारे जीव आणि न दिसणारे सूक्ष्मजीव, बुरशी इ. सजीव जमिनीत सतत काम करत असतात.
या सजीवांच्या क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ, अाेलावा आणि योग्य तापमान आवश्यक असते.
जमीन तपल्यास जमिनीतील लहान - मोठ्या सर्वच सजीवांचे कार्य थांबते.
म्हणून ओला, वाळलेला कचरा, पालापाचोळा आणि जमिनीवर पसरणारी मोट, उडीद ,मूग, रताळी वेल व बोरू, धेंचा सारखे हिरवळीचे पीक इ. द्वारे अच्छादन करता येते.अच्छादनामुळे तणांचे नियंत्रण ही साधते. अच्छादनामुळे जिथल्या तिथेच खत निर्मिती होते; ती क्रिया सतत सुरू राहते.

त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा सातत्याने होत राहतो.
शेतात उगवलेले तणकट कापून जागेवरच सोडणे, गिरिपुष्प, करंज सारख्या झाडाची पाने अच्छादनासाठी उपयोगी पडतात.
अच्छादनामुळे जमिनीत ओलावही भरपूर टिकून राहतो, बाष्पीभवन होत नाही.
अच्छादनामुळे जमिनीत ओलावही भरपूर टिकून राहतो, बाष्पीभवन होत नाही.
त्यामुळे ओलिताची गरजही खूप कमी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com