सोमवार, २ डिसेंबर, २०१९

गांडूळ खत आपण कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत पाहिलेली आहे. आता सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे हे बघणार आहोत. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड तयार करण्याचा सल्ला दिला जात असतो. ज्यांच्याकडे शेड घालण्यासाठी खर्च करण्याची ऐपत असेल त्यांनी पत्र्याचे किंवा तसले मजबूत शेड तयार करायला काही हरकत नाही. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड आवश्यक नाही. गांडुळाला उन्हापासून त्रास होतो म्हणून त्याला सावली पाहिजे आहे. ती छपराने सुद्धा देता येते. साधे कुडाचे शेड जरी केले तरी गांडूळ खत तयार करण्यात काही अडचण येत नाही. या छपराखाली आपल्या गरजेनुसार एक मोठा गादी वाङ्गा करावा आणि त्यात गांडूळ सोडून द्यावेत. या गांडुळांना खायला काही तरी देत रहावे. म्हणजे त्या वाफ्यावरच त्या खाल्लेल्या वस्तूपासून ती गांडुळे खत तयार करत राहतील. हेच गांडूळ खत होय. या वाफ्यावर पाचट किंवा गव्हाचे काड असे आच्छादन टाकावे. म्हणजे गांडुळाला उन्हापासून आणखी संरक्षण मिळेल. या वाफ्यावरच्या गांडुळाला खायला काय दिले पाहिजे ? आपल्या शेतातल्या खताच्या खड्ड्यातील ७० टक्के पर्यंत कुजलेला कचरा त्याला दिला तरी चालतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...