शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९


ज्वारी याचा उगम आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात झाला असे मानतात. एका मतानुसार ज्वारी इस पूर्व ११ व्या शतकात आफ्रिकेतून भारतात आली असे मानले जाते. परंतु द्वारका येथे झालेल्या उत्खननात, सुमारे पाच हजार वर्षांपुर्वीच्या एका जात्याच्या भागात सापडलेल्या पुराव्या वरून ज्वारीची शेती भारतात किमान पाच हजार वर्षांपासून अस्त्तित्वात आहे असे सिद्ध झाले आहे.भारतात मोठ्या प्रमानावरती हे पिक घेतले जाते . विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत या पिकाची लागवड होते. यास उष्ण हवामान मानवते. ज्वारीची लागवड आफ्रिका खंडात सर्वत्र आढळते. तसेच भारत, चीन, अमेरिका येथे मोठ्या प्रमाणावर होते. जगातील मोठ्या लोकसंख्येचे हे एक महत्त्वाचे अन्न उत्पादन आहे. भारतात मोठ्या भागात लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे. कोवळ्या ज्वारी चा भाजून हुरडा केला जातो. ज्वारी पुर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खान्यासाठी वापरले जाते. याचे बी लघवी च्या आजारांवर उपयुक्त असते. तसेच हे एक कामोत्तेजक म्हणूनही कार्य करते. हे पिक जनावरांचे खाद्य म्हणूनही वापरले जाते.सोलापूर जिल्हाला ज्वारीचे कोठार म्हणतात.सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.
ज्वारी पासून पापड्या ही बनवल्या जातात. ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महाराष्ट्र राज्यात मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्ररकार लागवडीत आढळतात. यात 'हायब्रीड ज्वारी' हाही एक प्रकार आहे.
एका ठराविक प्रकारच्या ज्वारीच्या बुंध्यातून रस काढून काकवी केली जाते
You Tube : https://bit.ly/35Sor9B
आपल्या ग्रुप साठी : https://bit.ly/2J8vTDV
आपल्या फेसबुक साठी : https://bit.ly/2qq2UF3
आपल्या ब्लॉग साठी : https://bit.ly/33QxXbt

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...