गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते.
शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतूनाशके न वापरता निव्वळ सेंद्रीय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो आणि या उपरही खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना, याची खातरजमा केली जाते. तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो. अन्यथा तो माल परत पाठवला जातो. या बाबत ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंंश उतरलेले खाद्य पदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोचत असतात.
याबाबत पंजाबमध्ये दोन विदारक अनुभव आले आहेत. पंजाबमध्ये सर्वत्र समृद्धी असल्यामुळे आणि ९५ टक्के जमीन बागायती असल्यामुळे सगळे शेतकरी सधन आहेत आणि ते आपापल्या शेतात राबत असतात. दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणाऱ्या या बायका तिथे आढळतच नाहीत. मग ही कसर भरून काढण्यासाठी बिहारमधले मजूर पंजाबमध्ये कामाला जातात. तेही मिळाले नाहीत तर पिकांमध्ये आलेले तण काढणार कोण, असा प्रश्न निर्माण होतो. तशी स्थिती आल्यास विषारी तणनाशकांचा मारा करून तण नाहीसे केले जाते. या विषारी तणनाशकाचे अंश गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये उतरलेले असतात. तो गहू खाणाऱ्याच्या रक्तात सुद्धा ते उतरतात. त्यामुळे रोपाड जिल्ह्यात काही तरुणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यांच्या रक्तामध्ये या तणनाशकाचे अंश सापडले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...