सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

असे करा सेंद्रिय शेतीमधील पीक संरक्षण!

 असे करा सेंद्रिय शेतीमधील पीक संरक्षण!

#agrobhet_organic # #farming #agriculture #farm #farmlife #farmer #tractor #motivation

सेंद्रिय शेतीमध्ये जशी-जशी वातावरण निर्मिती होईल तशी जमिनीची सुपीकता वाढेल मित्र किडी वाढतील. हळू-हळू रोग व किडीही कमी-कमी होत जातील. आरंभी पीक संरक्षणासाठी काही उपाय योजावे लागतात पण पुढे काहीच करण्याची गरज उरत नाही. त्याचे योग्य प्रकारे पीक नियोजन केले की झाले.

विकर्षक वनस्पती : सब्जा,आष्टा, डीकामाली इ. तीव्र वासाच्या वनस्पतीपासून किडे दूर जातात. शिळ्या गोमूत्राचे कार्यही अशाच प्रकारे असते. पीकात अधेमधे अशी वनस्पती असायला हवी वारा सुटला की, आपणास सब्जाचा घमघमाट जाणवतो. किड्यांना मात्र हे गंध नेहमीच जाणवत असतात.

सापळा पीक : चवळी, मोहरी, राईवर विसावतो, झेंडू वर तुडतुड्याची गर्दी दिसते. त्यामुळे या किडीपासून मुख्य पीक वाचते. अनेक शेतकऱ्यांचा याबाबत गैरसमज होतो कि, चवळीमुळे मावा वाढतो असे त्यांना वाटते आणि ते ह्या पिकांना दूषण देतात. कपाशीच्या दोन ओळी मध्ये लवकर येणारी झुडपी प्रकारची चवळी लावावी. याचे दुहेरी फायदे आहेत चवळीवर मावा एकत्र होतो आणि कपाशीला चळवळीमुळे नत्र पुरवठा होतो. आवश्यकतेनुसार चवळीवर मावा किडीसाठी कडूलिंबासारखे औषध फवारता येईल. चवळीचे उत्पन्नही मिळते त्यातून कपाशीचा लागवड खर्च निघतो.

सेंद्रिय शेती काळाची गरज बनत चालली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क करा : अॅग्रोभेट ऑरगॅनिक - 9767981244

Image may contain: outdoor and nature, text that says 'असे करा सेंद्रिय शेतीमधील पीक संरक्षण! AgrobhetOrganic Agrobhet Contact:9767981244 www.agrobhet.com agrobhet@gmail.com'

👍आमचे "Agrobhet organic" फेसबुक पेज लाईक करा आणि मिळवा सेंद्रिय शेती विषयक सर्व अपडेट...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...