शुक्रवार, २ मार्च, २०१८

*काय करतोय शेतकरी राजा?*
*कुठे चालली आहे वाट?*

पिकवतो तो पण त्याच्या पिकांवर जगणारे दुसरे.
जो खातो शेतकऱ्यांचे तो श्रीमंत,
जो पिकवतो तो मात्र गरीबच राहिलाय.
*का?* *कशामुळे?* *कधी विचार केलाय?*

ना कर्ज माफी लवकर मिळतीये ना कर्जावर सूट.
ते तर सोडा , जे अन्न धान्य कष्टाने घाम गाळून उगवतो, पिकवतो त्यावरही योग्य मोबदला नाही.

बाकी सर्व पुढे गेले, शेतकरी मात्र मागासलेला का? कोणामुळे कधी केलाय विचार, नाही केला.

मोठं मोठे प्रोजेक्ट, कंपन्या त्याच्या जमिनी घेऊन उभ्या केल्या जातात. त्याच्याच जमिनीवर, त्याची इच्छा नसताना.
आणि जरी जमिनी घेतल्या

*त्याबदल्यात शेतकऱ्याला मिळते काय?*

कोटीच्या जमिनीची किंमत लाखात मोजली जाते.
पुनर्वसन केले जाईल म्हणून सांगितले जाते, ज्या माती शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या गेल्या ती जमीन अशीच द्यावी लागते.

शेतकऱ्याने जमिनी दिल्यावर काम काय करायचे तर शहरात जाऊन नोकरी करा म्हंटले जाते,

म्हणजे आपल्या शेतात अगदी हुशारीने काम करणारा शेतकरी, शहरात जाऊन आडानी मानला जातो. दुसरा पर्याय हा दिला जातो की, ज्या कंपन्या यिथे उभ्या राहतील तिथे त्याला काम दिले जाईल,
आणि कंपन्या उभ्या राहिल्या की याला एकच काम दिले जाते, कंपनी गेट वर उभा राहण्याचे,

म्हणजे जो खरा त्या जमिनीचा मालक तो नोकर होतो. आणि जो त्यांच्या जमिनीवर कंपनी टाकतो तो मालक होतो. आणि या सर्वाला विरोध केला तर विकासामध्ये शेतकरी अडसर घालतात म्हंटले जाते.

आज पर्यंत ना कोणाला योग्य मोबदला मिळाला,ना पुनर्वसन झाले, भाक्रा- नांगल सारखे मोठे उदाहरण सर्वान समोर आहे.

*१६० कोटी रुपये औद्यागिक कंपन्यांचे टॅक्स माफ केले जातात,*
आणि

*१२० कोटी रुपये कर्ज माफी करायला यांना २-२ वर्षे लागतात.*

*देशाचा मुख्य व्यवसाय शेती हे मान्य करायचे तरी कसे?*

*कुठे तरी समजण्याची गरज आहे.*

*जो दुसऱ्यांना अन्न पुरवतो त्याने विकसित होण्याची गरज आहे.*

*आता काही तरी बदल घडविण्याची गरज आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...